जी-20 शिखर परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची (जीबीए) घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची (जीबीए) घोषणा केली आहे. हा जागतिक ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.जैवइंधनाचा वापर सुलभ करण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग यांची आघाडी विकसित करण्यासाठी जीबीए हा भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. हा उपक्रम भारतासाठी अनेक आघाड्यांवर फायदेशीर ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादकांना एकत्र आणने हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. जैवइंधनांना ऊर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली म्हणून स्थान देणं तसेच रोजगार आणि आर्थिक वाढीस हातभार लावणं हा देखील उद्देश आहे. जीबीएच्या घोषणेमुळं जी-20 अध्यक्ष म्हणून आणि “व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताचा सकारात्मक अजेंडा दिसून येत आहे.

जागतिक विकास आणि रोजगारावाढीस चालना

जीबीए मूल्य साखळीमध्ये क्षमता वाढविण्याचे मार्ग, राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी तांत्रिक समर्थन आणि धोरणात्मक पाठ-सामायिकरणास प्रोत्साहन देऊन शाश्वत जैवइंधनाच्या जागतिक विकास आणि रोजगारावाढीस चालना मिळेल. ही आघाडी उद्योग, देश, इकोसिस्टम प्लेअर्स आणि प्रमुख भागधारकांना मागणी आणि पुरवठ्याचे मॅपिंग करण्यात मदत करण्यासाठी तसेच तंत्रज्ञान प्रदात्यांना अंतिम वापरकर्त्यांशी जोडण्यासाठी एक बाजारपेठ तयार करणे सुलभ करेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button