
आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची
. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची….महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल पाहू शकणार आहेत.12वीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर आता 10वीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती देण्यात येईल. 10वीचा निकाल 20 मे पूर्वी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, शिक्षण मंडळाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये.