
रत्नागिरीतील तरुण वकील सौरभ सोहनी याने मोबाईल वर स्टेटस ठेऊन भाटे पुलावरून उडी मारून केली आत्महत्या
_रत्नागिरीतील तरुण वकील सौरभ सोहनी याने मोबाईल वर स्टेटस ठेऊन काल रात्री भाटे पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मूळचा राजापूर येथील असलेला सौरभ रत्नागिरी प्रॅक्टिस करत होता काल रात्री त्याने मोबाईलवर आत्महत्या करत असल्याचे स्टेटस ठेवले होतेकाल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत असताना सौरभ हा मोटरसायकलने भाटे पुलावर आलाव तेथून त्याने समुद्रात उडी मारली आज सकाळी त्याचा मृतदेह खडपे वठारभागात आढळून आलाकाल रात्री 9 ते 9.30वाजण्याच्या दरम्यान ने ऍड. सौरभ सोहनी याने आपल्या मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो म्हणून सांगितले. दरम्यान काल रात्री सौरभ ने मोबाईल ला स्टेटस ठेवले होते.माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूम मेट ची, मी रहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नये ही विनंती…!! क्षमस्वहा स्टेटस काल रात्री वाचल्यावर तात्काळ त्यांच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधला तात्काळ शहर पोलीस मोबाईल लोकेशनवर कोर्टाच्या जवळपास लोकेशन दाखवत असल्यामुळे सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली भाटयाच्या पुला वर त्यांना मोटरसायकल मिळाली. परंतु समुद्राला खूप पाणी असल्यामुळे आणि काळोख रात्रीची वेळ होती काळोख होता त्यामुळे त्याचा नीट शोध घेता येत नव्हता परंतु आज सकाळी खडपे वठार समुद्रकिनारी सौरभ सोहनी याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सौरभ हा मनमिळावू स्वभावाचा होता त्याचा मित्र वर्ग मोठा होता सौरभ ने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास सुरू आहे.www.konkantoday.com