श्रीराम मंदिरातील भजनी कलावंत मार्गदर्शन मेळाव्याला प्रतिसाद
रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या भजनी कलावंत मागदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात हरचेरी उमरे येथील प्रसिद्ध भजनी बुवा विश्वनाथ भाटे यांनी भजनी कला अधिक समृद्ध करण्यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन करताना अभंग, गवळण, भारूड, भजने आपल्या सुमधुर आवाजात सादर केली.
मेळाव्यात आकाशवाणी कलावंत अनुजा बाम, महिला भजनी बुवा शुभांगी वारेकर, उत्कर्ष महिला भजन मंडळ मिर्या येथील महिला तसेच भजनी बुवा रमेश गोवेकर यांनी अभंग, भारूड, गवळण आपल्या गोड आवाजात सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
www.konkantoday.com