
रस्ता झाला खराब म्हणून एसटी वाहतूकच बंद
गुहागर तालुक्यातील सावर्डे – तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला असुन यामुळे इथून प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे.नुकतेच या खड्ड्यामुळे एसटीचा अपघात होता होता वाचला. त्याचबरोबर जीवितहानी आणि वित्तहानी वाचली. याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पडवे गावात जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा आणि व्यवसाय करणारा मच्छी व्यवसायिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,कनिष्ठ – वरिष्ठ महाविद्यालयीन,आयटीआय विद्यार्थी, नेयमीत प्रवासी यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
www.konkantoday.com