मुंबई गोवा महामार्ग क्र. 66 वर जड-अवजड वाहनांची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद


*रत्नागिरी, :- गौरी गणपती सणासाठी मुंबई गोवा महामार्ग क्र.66 वर जड-अवजड वाहने वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंदीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
गणेशोत्सव 2023, 19 सप्टेंबर रोजी पासून साजरा होत आहे. या सणानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते.
मुंबई-गोवा क्र.66 वर जाणारी अवजड वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यानी महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.एम.व्ही.ए-0589/सीआर/1061/टीआरए-2, 19 मे 1990 चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 गणेशोत्सव सण पूर्ण होईपर्यत जड-अवजड वाहतुक बंद करण्यात येत आहे. हा आदेश दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, एसटी महामंडळ बसेस, ट्रॅव्हल्स बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना लागू असणार नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button