मुंबईत दहीहंडी उत्सवामध्ये तब्बल १९५ गोविंदा जखमी
दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी दिली. मुंबईसह ठाणे आणि पुणे अशा मोठ्या शहरातही दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला
या उत्साहाच्या दरम्यान काही ठिकाणी गालबोटही लागल्याचे दिसून आले. मुंबईत दहीहंडी उत्सवामध्ये तब्बल १९५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमी झालेल्या एकूण गोविंदापैकी १४ गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर ६२ गोविंदाना प्राथामिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ३१ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडीदरम्यान एकूण १९५ गोविंदा जखमी झाले आहेत. १७७ गोविंदाना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर १८ गोविंदांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. गोविंदांच्या पायाला, हाताला तर कमरेला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या जखमी गोविदांवर कळवा आणि सिव्हील रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामधील कोणत्याही गोविंदाना गंभीर दुखापत झालेली नाही. प्राथामिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com