मानसकोंडमधील बोअरवेल ब्लास्टिंग ग्रामस्थांनी पाडले बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामधील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता.या बोअरवेल ब्लास्टिंगमुळे मानसकोंड येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. मानसकोंड गावालगत हायवेला असणार्या घरांना मोठ्या प्रमाणात धोका पोहोचत आहे. त्यामुळे हे ब्लास्टिंगचे काम बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले होते. मात्र ठैकेदारांनी त्याला केराची टोपली दाखविली.
मानसकोंड ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकांच्या घरांना तडे जात असतील त्यावर लोकांची घरे पाडून महामार्ग होणार असेल तर त्याला शंभर टक्के विरोध करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. www.konkantoday.com