पवई एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची लॉकअपमध्येच आत्महत्या
पवईतील एअर होस्टेस हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवईतील एअर होस्टेस खून प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी लॉकअपमध्ये आत्महत्या केली आहे.प्राथमिक माहितीनुसार आरोपीने स्वत:च्या पॅन्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती.
www.konkantoday.com