चिपळूण शिवसेना शहरप्रमुखपदी शशिकांत मोदी
शिवसेना फुटीनंतर शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.उद्धव ठाकरे गटाच्या रिक्त असलेल्या शहरप्रमुख पदावर माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांची गुरूवारी निवड जाहीर करण्यात आली.
येथील पालिकेवर सातत्याने निवडून जात असलेल्या मोदी यांनी यापूर्वी पालिकेत शिवसेना गटनेता आणि आरोग्य समिती सभापतीपदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. संघटनेत विभागप्रमुख, उपशहरप्रमुखपदी धुराही सांभाळली आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटीनंतर माजी आमदार सदानंद चव्हाण, शहरप्रमुख उमेश सपकाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले; मात्र मोदी यांनी संघटना न सोडता ठाकरे यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने आपले काम सुरू ठेवले. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या शहरप्रमुख पदावर मोदी यांना संघटनेने बढती दिली आहे.
www.konkantoday.com