घरगुती ग्राहकांसाठी असलेल्या सौरछत योजनेला वाढता प्रतिसाद
सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी केंद्राकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछताकरिता ४० टक्केपर्यत अनुदानाची योजना सुरु आहे.महावितरणमार्फत ही योजना राबविली जात असून जिल्ह्यातील ५६ (२१४ किलोवॅट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसविली असून ३३ (९९ किलोवॅट) घरगुती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे.
भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. याचा वापर वाढविण्यासाठी केंद्राकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछताकरिता ४० टक्केंपर्यंत अनुदानाची योजना सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ (४०० किलोवॅट) तर सिंधुदुर्गातील ५६ (२१४ किलोवॅट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६३ (१८६ किलोवॅट) तर सिंधुदुर्गातील ३३ (९९ किलोवॅट) घरगुती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे.
www.konkantoday.com