कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे.राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यात अनेक भागांमध्ये सकाळपासूनत पावसाने जोरदार हजेरीही लावली आहे. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
www.konkantoday.com