
स्पर्धेच्या सरावासाठी फेकलेल्या भाल्याने त्याचा जीव गेला
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका शाळेत दुर्दैवी घटना घडली आहे
माणगाव तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेसाठी सराव करत असलेल्या विद्यार्थ्याला सहकारी विद्यार्थ्याने फेकलेला भाला डोक्यात घुसून दुर्देवी मृत्यू झाला आहे. य़ाप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.घटना माणगाव तालुक्यातील पुरार येथील आयएनटी इंग्रजी शाळेत बुधवारी साधारण 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. हुजेफा डावरे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुजेफा हा तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेची तयारी करत होता आणि सहकारी विद्यार्थी त्याला तो भाला घ्यायचा आणि परत फेकत असे. सराव सुरु असताना हुजेफाने भाला फेकला होता सहकारी विद्याथ्याने तो पुन्हा त्याच्यादिशेने फेकला आणि त्याच्याचवेळी हुजेफा शूजची लेस बांधायला खाली वाकला आणि वेगाने आलेला भाला त्याच्या डाव्या डोळ्याच्यावर डोक्यात घुसला.
रायगडच्या या विद्यार्थ्याचा तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेची तयारी करत असताना सहकारी विद्यार्थ्याकडून भाला लागल्याने हुजेफाचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com