शीळ येथे गळफास घेवून तरूणाची आत्महत्या


रत्नागिरी तालुक्यातील शीळ कदमवाडी येथे गळफास घेवून तरूणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सिद्धेश कदम (२६, रा. शीळ कदमवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली.
सिद्धेश कदम हा ४ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या नवीन बांधलेल्या घरामध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी सिद्धेश याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button