मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला
महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्रे द्यावे.कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीय. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कालच याबाबत घोषणा केली होती. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत जीआर काढलाय
www.konkantoday.com