
जादा तिकिट आकारल्यासतक्रार नोंदवावी-प्रादेशिक परिवहन अधिकारी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खाजगी बस वाहतूकदाराने ठरविलेल्या दराच्या ५० टक्के अधिक दीडपट आकारणी करण्यास परवानगी असून या दराच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटसअप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकिट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन रत्नागिरीचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे. www.konkantoday.com




