
*चिपळूण-गुहागर बायपास मार्गाची दुरवस्था अद्यापही कायम*
____करोडो रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या गुहागर बायपास मार्गाची आता मिरजोळी-साखरवाडी व पॉवरहाऊस या दोन्ही बाजूनी दुरवस्था होत चालली आहे. दोन ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने खिरापत वाटल्यासारखी कामे दिल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप होत आहे. खेड-बावशेवाडी येथे मोरीचे काम अर्धवट असल्याने त्यावरून वाहने चालवताना मणका मोडत आहे, झाडेझुडपे रस्त्यावर आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तरीही अधिकारी व ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून गुहागर बायपास मार्गावरून वाहन चालकांचा खडतर प्रवास सुरू आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत करोडो रुपयांची उधळण केली. तरीही त्याच्या खड्ड्यांचे ग्रहण सुटत नव्हते. यामुळे यासाठी अनेकांनी आंदोलने व उपोषणे केली. त्यातही बरेच राजकारण झाले. मात्र तरीही राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून वर्षभरापूर्वी डांबरीकरण, संरक्षण भिंती, मोर्या व अन्य कामे करण्यात आली. काम मिळवण्यावरुन मोठी स्पर्धा झाल्याने व अधिकार्यांवर राजकीय दबाव आल्याने दोन ठेकेदारांना या रस्त्याचे काम वाटून देण्यात आले.www.konkantoday.com