आंतरजिल्हा बदलीमुळे पुन्हा एकदा सुमारे तीनशे शिक्षक परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत
आंतरजिल्हा बदलीमुळे पुन्हा एकदा सुमारे तीनशे शिक्षक परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत.सहा महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या बदलीने ७१५ शिक्षक रत्नागिरी जिल्हा सोडून आपापल्या जिल्ह्यात हजर झाले. बदली, निवृत्त शिक्षकांचा विचार करता रिक्त पदांचा आकडा अडीच हजारच्या घरात जाणार आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण कुणी द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बदलीपात्र उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करावे, असे आदेश गेल्या आठवड्यात काढण्यात आले आहेत. ते पुन्हा एकदा आपापल्या जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिक्षणाचा खेळखंडोबा होणार असल्याची चर्चा आहे. नवीन भरती होत नसल्याने बदली होऊन गेल्यानंतर रिक्त जागांची संख्या वाढत आहे. येणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असते व दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे
www.konkantoday.com