राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच कुमार शेट्ये यांना देण्यात आले.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. जिल्ह्यातही २ गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. कुमार शेट्ये यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड होईल, असा अंदाज होता; मात्र ही जबाबदारी युवानेते सुदेश मयेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कुमार शेट्ये नाराज असल्याचा सूर होता. त्यानंतर त्यांची वरिष्ठ पातळवीर मनधरणीही करण्यात आली. योग्य वेळी आपण आपला निर्णय जाहीर करू, असा इशारा दिला होता.
शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले गेलेले कुमार शेट्ये यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांना पक्षात बढती देण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, बशीरभाई मुर्तुझा आदी अनेक नेत्यांनी कुमार शेट्ये यांचे अभिनंदन केले.
www.konkantoday.com