भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय-विजय वडेट्टीवार


मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ काही दिवसापुर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
किरीट सोमय्यांचा व्हिडीओ लोकशाही न्यूजने प्रसारित केला होता. त्यातच आता लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टिका केलीय.

भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू. मात्र, असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील. असं लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांनी म्हटलंय. त्यावर आता लोकशाही पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय. राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! असा घणाघात देखील त्यांनी केलाय.

दरम्यान, किरीट सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टिका करण्यात आली होती. यातच या व्हिडीओची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आलीय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button