
दापोलीच्या संख्या पोवार यांची रत्नागिरी जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
दापोली .:- महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती खा. शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्या त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील क्रियाशील व्यक्तिमत्व असणा-या दापोली येथील संख्या गुरुप्रसाद पोवार यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सहीने संख्या पवार यांना देण्यात आले आहे .रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संख्या पोवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com