
‘इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च’ चा ई- उद्घाटन कार्यक्रम केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पार पडला.
मुख्य कार्यकारी संचालक म्हणून कोंकण चे सुपुत्र डॉ.हृषिकेश केळकर पाहणार काम
गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च'(आयफर) या स्वायत्त संस्थेची स्थापना “अमारा” फाऊंडेशन नागपूर च्या वतीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ,शिक्षण,प्रशिक्षण व संशोधन या साठी करण्यात आली आहे.सर्व या संस्थेच्या अध्यक्षा सौ.अजिता डोरलीकर असून त्या सामाजिक कार्यात गेले अनेक वर्षे कार्यरत आहेत. सदर संस्थेची संकल्पना या संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक व कोकणातील अग्रेसर युवक स्वयंसेवी सामाजिक संस्था असणाऱ्या लाईफलाईन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.हृषिकेश चंद्रशेखर केळकर यांची आहे.तसेच संस्थेचे संचालक व विदर्भात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत शिक्षण तज्ञ श्री.महेंद्र निंबारते हे आहेत . केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद जी नाईक उद्घाटन प्रसंगी म्हणाले की ‘आज जागतिक आरोग्य क्षेत्रात अनेक समस्या व अनेक आव्हानं असताना सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तज्ञ मनुष्यबळ आवश्यक आहे. ‘आयफर ‘ च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील विविध व्यावसायिक वैद्यकिय अभ्यासक्रमांचा फायदा आयुष व ‘मॉडर्न मेडिसिन’ चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे तसेच ‘आयफर’ च्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विविध प्रशिक्षण व संशोधन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत, ज्यामुळे समाजाचे हित देखील साध्य होणार आहेत,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच ‘आयफर’ च्या संपूर्ण टीम ला भविष्यातील वाटचालीस केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या व ‘ ई – उद्घाटन ‘ संपन्न झाले असे जाहीर केले.