किरकोळ रजा आंदोलनामुळे शाळांचे कामकाज गडबडले
विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या या प्रमुख मागणीकरिता शिक्षक समितीकडून मंगळवारी शिक्षक दिनी किरकोळ रजा आंदोलन छेडण्यात आले. शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ रजेवर जाण्याचा निर्णय घेत हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील कामकाज या दिवशी गडबडले होते. या आंदोलनाला जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम प्राथमिक शाळांतील शैक्षणिक कामकाजावर झाला होता. या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक समितीकडून देण्यात आला आहे.
www.konkantoday.com