आंबेत पुलाच्या नवीन कामाला कोणताही धोका नसल्याचा उपअभियत्यांचा निर्वाळा
म्हाप्रळ आंबेत
पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना जुन्या पिलरचे बांधकाम गुरूवारी कोसळले. मात्र हा गॅलरीचा भाग कोसळला असल्याने नवीन कामास धोका नसल्याचा निर्वाळा माणगाव सार्वजनिक
बांधकाम विभागाचे उपअभियंताश्रीकांत गणगणे यांनी दिला.
माणगाव सार्वजनिक बांधकाम
विभागाकडून झालेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. स्लॅबच्या कामासाठी वारण्यात आलेल्या
बेअरिंग लावण्यात आल्यानंतर बेअरिंगची पाहणी करण्यासाठी गॅलरी तयार करण्यात आली होती. या गॅलरीचे बांधकाम पडले. जुन्या पी. पिअर्सचा स्लॅब व आर्टिक्युलेशनचा भाग पूर्वी
आवश्यक तेवढा तोडला होता. नवीन गर्डर्सचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु असताना जुन्या पिअरचे आर्टिक्युलेशन पडले. मात्र पुलाच्या स्लॅबच्या कामात यामुळे कोणतीही बाधा आली नसल्याची माहिती गणगणे यांनी दिली.
मात्र या घटनेमुळे स्लॅबचे काम पूर्ण होण्याचे नियोजित वेळापत्रक
लांबलेले असल्याने गणेशोत्सवात या पुलावरून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता मावळली आहे
www.konkantoday.com