दापोली तालुक्यातील आंजर्ले भंडारवाडा येथील एक बंद घर फोडून ऐवज लांबविला
दापोली तालुक्यातील आंजर्ले भंडारवाडा येथील एक बंद घर फोडून आज्ञात चोरट्याने घरातील रोख रकमेसह दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबद्दल दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आजर्ले, भंडारवाडा येथील भालचंद्र बाळकृष्ण केळसकर हे रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आपला पुण्यातील मुलगा याच्याकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहनाऱ्या शीला भोसले यांना घरावर लक्ष ठेवणेस सांगितले होते. सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शीला भोसले यांना केळसकर यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब केळसकर यांचा पुतण्या प्रथमेश याला सदर घटना सांगितली. यावेळी प्रथमेश याला घराच्या मागील खिडकीचे गज कापून घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. यानंतर प्रथमेश याने भालचंद्र केळसकर यांच्याकडे संपर्क साधून घडलेली घटना कथन केली.
आज मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी भालचंद्र केळसकर हे दापोलीमध्ये आले. यानंतर त्यांनी चोरीची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली.
भालचंद्र केळसकर यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या घरातील देवघराचा ड्रॉवर व खोलीतील लोखंडी पेटीतील सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ६ हजार २०० रुपये किमतीचे दागिने
अज्ञात चोरट्याने चोरून नेले
www.konkantoday.com