
दापोलीत ३८ सार्वजनिक, ३२७ खासगी हंड्या फुटणार
दापोली तालुक्यामध्ये ३८ सार्वजनिक तर ३२७ खासगी दहीहंड्या फुटणार आहेत. तसेच प्रत्यक घरात दहिहंडीचा आनंद बालगोपाळ घेणार आहेत. तसेच आज गोकुळाष्टमी तर उद्या गोपाळकाला पार पडणार आहे. गोपाळकालाच्या दिवशी गावात घरोघरी जावून गोविंदा हंड्या फोडणार आहेत. पूर्वी नेमक्याच घरात हंडी फोडली जात होती. तर उर्वरित घरात पाणी ओतून गोविंदा आनंद लुटत असत. मात्र आता प्र्रत्येक घरात हौस म्हणून छोटीशी हंडी बांधून ती फोडली जाते. गोविंदा कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दापोलीच पोलीस लक्ष ठेवून आहेत.
www.konkantoday.com