सिंधुदुर्गात शाळांना शिक्षक न दिल्याने युवा सेनेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्याकडे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.त्यासाठी शिक्षकदिनी मंगळवारी ( 5 सप्टेंबर 2023 रोजी) सकाळी 10.30 वाजता युवासेनेच्या वतीने केसरकर यांच्या सावंतवाडी येथीर घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवती,डिएड बेरोजगारानी यांनी तसेच युवासेना पदाधिकारी, युवासैनिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन युवासेनेकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com