
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. शिक्षकांचा गौरव करण्याकरिता प्रतिवर्षी लायन्स क्लबतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. यात प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय या विभागातील मुख्याध्यापकांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षक यांचाही सन्मान करत आहे.
शिक्षण समिती अध्यक्षा मेघना शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आसक्ती संदेश भोळे (ल. ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदीर), रमेश भिमराव चव्हाण (रा. भा. शिर्के प्रशाला), डॉ. प्रफुलदत्त प्रभाकर कुलकर्णी (प्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वायत्त) यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. यांना सीए एच. एल. पटवर्धन पुरस्कृत (कै.) ल. ग. पटवर्धन स्मृती पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीमार्फत अन्य काही पुरस्कार देण्यात येणार आहेत. बालवाडी, शिक्षिका विभागामध्ये अध्यक्षा शिल्पा पराग पानवलकर पुरस्कृत (कै.) राजश्री दत्तात्रय गडकरी पुरस्कारासाठी रश्मी शेखर लेले (बालवाडी शिक्षिका, नाचणे छत्रपतीनगर) यांची निवड झाली आहे. अंगणवाडी सेविका विभागामध्ये अनुजा योगेश करमरकर (अंगणवाडी सेविका, शिरगाव घवाळीवाडी) यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार गणेश धुरी, साक्षी धुरी यांनी (कै.) अविनाश शिवराम मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे. (पै.) हुसेन खान आदमखान फडनाईक स्मृती पुरस्कारासाठी शुभांगी अजित वायकूळ (माजी मुख्याध्यापिका फाटक हायस्कूल) यांची निवड केली आहे. हा पुरस्कार एमजेएफ अॅड. शबाना वस्ता व अस्लम वस्तायांनी पुरस्कृत केला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १० सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता लायन्स आय हॉस्पिटल सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा. सचिन टेहाळे (नवनिर्माण कॉलेज), झोन चेअरमन श्रेया केळकर, लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एमजेएफ डॉ. संतोष बेडेकर उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com