रेडीरेकनरच्या दराबाबत सभा, सभासदांनी उपस्थित राहण्याचे क्रेडाईतर्फे आवाहन
रत्नागिरी : रेडीरेकनरच्या दराबाबतची मिटिंगचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. दुय्यम निबंधक खात्यातर्फे करण्यात आलेले आहे. या मिटिंगसाठी दुय्यम निबंधक खात्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेचे नियोजन क्रेडाई रत्नागिरीने हॉटेल व्यंकटेश, मारुती मंदिर रत्नागिरी येथे केले आहे. सभासदांनी रेडीरेकनर बाबत आपल्या सूचना किंवा काही बदल सुचवायचे असल्यास येताना लेखी स्वरुपात घेऊन येणे. सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहून रेडीरेकनर मध्ये सन २०२४-२०२५ या वर्षासाठी होणाऱ्या बदलाची माहिती समजून घ्यावी व मिटिंग साठी सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे असे अवाहन क्रेडाईतर्फे करण्यात आले आहे
www.konkantoday.com