रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर बसलेली मोकाट गुरे हे चित्र लवकरच बदलणार ,पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार
रत्नागिरी शहराच्या विविध भागात रस्त्यावर मधोमध बसलेली बसलेली मोकाट गुरे हे चित्र रत्नागिरीच्या नागरिकांना परिचित असले तरी लवकरच त्यात बदल होण्याची चिन्हे आहेत मोकाट गुरांच्या बाबतीत पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध भागात मोकाट गुरांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले आहे. ही मोकाट गुरे पकडून ती चंपक मैदानावर बांधण्याच प्रयोग केला जाणार आहे. चारहीबाजूंनी त्याला बॅरेकेट ला प्रशासन त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्था करणार आहे अनेक वेळा या गुरांचे मालक गुरे नेण्यासाठी येत नाहीत
त्यामुळे अशा गुरांपैकी
यातील दूभती जनावरे गरजू शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार मात्र या गुरांचा वापर शेतकरीच करीत असल्याबाबत पोलि प्रशासनाचे लक्ष राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंतयांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोकाट गुरांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना होणारा उपद्रव थांबवण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना केली जाणार आहे. मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यावर या गुरांचा कळपच्या कळप ठाण मांडून बसलेला असतो. यामुळे वाहतूक कोंडी होते. काहीवेळा अचानक गुरे रस्त्यात येऊन अपघात झाले आहेत, असे अनेक प्रकार घडूनसुद्धा पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. पालिकेकडे कोंडवाडा नाही, म्हणून गुरांना पकडण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच त्यांना शहराबाहेर हाकलविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु तो देखील तोकडा पडला. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे आता लवकरच याबाबत कार्यवाही होईल असा अंदाज आहे
www.konkantoday.com