भाजप दक्षिण रत्नागिरीतर्फे आयोजित पारंपरिक मंगळागौर स्पर्धा हाऊसफुल्ल
रत्नागिरी : भाजप दक्षिण रत्नागिरी आयोजित पारंपरिक श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांनी झिम्मा, फुगडीचा खेळ खेळला. हाऊसफुल्ल गर्दीत महिलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यातून स्त्रियांनी आनंदासोबत निरामय आरोग्याची साधना केली. डॉ. ज. शं. केळकर मार्गावरील जयेश मंगल पार्क येथे हजारो महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. भाजपा प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवी नाईक व सौ. माधवीताई माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धेचे नियोजन भाजपा दक्षिण रत्नागिरी शहर महिला मोर्चा यांच्या संकल्पनेतून व दि यश फाऊंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. ही स्पर्धा भरगच्च झाली. श्रीमती देवस्थळी आणि श्रीमती सोहोनी यांनीं स्पर्धेचे परीक्षण केले. सहभागी प्रत्येक संघाला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सहभाग चषक प्रदान करून स्पर्धेची रंगत वाढवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सहभागी २८ संघांचे वर्गीकरण ग्रामीण आणि शहर अशा दोन विभागांत करून यामधून विविध निकषांवर परीक्षण झाले व दोन्ही गटांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एक उत्तेजनार्थ अशी चार पारितोषिके वितरीत करण्यात आली.
ग्रामीण भागातील पारितोषिक प्रथम तिरंगा ग्रुप, भोके, द्वितीय श्रीराम ग्रुप, साखरपा, तृतीय रणरागिणी कर्ला- रत्नागिरी आणि उत्तेजनार्थ श्रावण सखी संघाला बक्षीस मिळाले. शहर भागातील पारितोषिक प्रथम सखी ग्रुप कुवारबाव, द्वितीय जिजाऊ ग्रुप रत्नागिरी शहर, तृतीय गृहलक्ष्मी फगरवठार- रत्नागिरी आणि उत्तेजनार्थ महालक्ष्मी क्रांतीनगर- रत्नागिरी यांनी पटकावले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवीताई नाईक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब माने उपस्थित होते. त्यांच्यासोबत सौ. माधवी माने, सौ. नीलमताई गोंधळी, महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार, प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, रत्नागिरी शहर अध्यक्षा सौ. शोनाली आंबेरकर, ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ. प्राजक्ता रुमडे, जाकीमिऱ्या सरपंच सौ. आकांक्षा कीर, माजी नगरसेविका सौ. पल्लवी पाटील, सौ. संपदा तळेकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मानसी करमरकर, ग्रा.पं. सदस्या सौ. अदिती भाटकर, माजी पं. स. सदस्या सौ. स्नेहा चव्हाण, सौ. सुजाता साळवी, सौ. राजश्री मोरे, सौ. वर्षा ढेकणे, सौ. सायली बेर्डे, सौ. दिपा तोडणकर, सौ. राधा हेळेकर, शिवानी सावंत, सौ. धनश्री साळवी, नूतन परब, पूर्वा शेट्ये यांच्यासह अन्य अनेक महिला तसेच युवती पदाधिकारी, कार्यकर्त्या, यश फाऊंडेशनच्या सौ. मानसी मुळे, सौ. अरुणा परब, सौ. शलाका लाड, सौ. संघमित्रा कुरतडकर, मानसी वाझे आणि सहकारी तसेच अन्य महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
www.konkantoday.com