
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांच्या उपस्थितीत संपर्क युनिक फाउंडेशन चां सन्मान
रत्नागिरी…. गेली 5 वर्षेरत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चां सन्मान भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. रत्नागिरी मध्ये ऑल इंडिया मुशायरा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात देशातील नामांकित कवी, गझलकार, साहित्यिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून खैरे उम्मत फाउंडेशन, मिरकरवाडा, रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चा सन्मान केला. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा उदयजी सामंत यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला, यावेळी एनजीओ चे अध्यक्ष शकील गवाणकर, युसुफ शिरगांवकर,मुकेश गुंदेजा, इस्माईल नाकाडे,जमीर खलफे,नाझीम मजगावकर यांनी हा सन्मान स्वीकारला.हा सन्मान माझ्या सर्व सभासदांनी कोरोना काळात उत्तम काम केल्याने आणि सातत्याने सामाजिक कार्य करत राहणा-या माझ्या सर्व सहका-यांचा आहे असे एनजीओ चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com