खेड नगर परिषदेचा कारभार पुन्हा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या हाती
खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची अवघ्या १० महिन्यातच अन्यत्र बदली झाली. त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीने येथील नगरपरिषदेतील प्रभारींच्या
मुख्याधिकारीकारभाराला
‘ब्रेक’लागलेलाअसतानाच तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पुन्हा नगरपरिषदेत प्रभारींचा सिलसिला सुरु झाला आहे. त्यांच्या कारभाराबाबत नागरिकांतून तक्रारींचा सूर आळवला जात होता. तसेच राजकीय पक्षांनाही त्यांच्या. कारभारावर ताशेरे ओढले होते. येथील नगरपरिषदेचा कारभार यापूर्वी अनेक महिने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्याच हातात होता
www.konkantoday.com