कार्यक्रम चालू असताना चिपळूण नाट्यगृहाचे सिलिंग शीट पडली
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या एसी कामाचे मोजमाप घेताना अधिकाऱ्याचा सिलिंगवर पाय पडल्याने स्क्रू निघालेली शीट त्यानंतर जादूगाराचा कार्यक्रम सुरू असताना खाली पडली. मात्र यात कोणतीही दुर्घटना घडली नाही
काही दिवसांपूर्वीच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे आता ज्या ठेकेदारांनी कामे केली आहेत, त्यांची देयके देण्याच्या कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेचे संबंधित अधिकारी सिलिंगच्या वरील भागात जाऊन एसी कामाचे मोजमाप करीत होते. यावेळी त्यांचा पाय सिलिंगवरपडल्याने एका शीटचे स्क्रू निघाले. त्यामुळे ती लटकत होती. मात्र पाय पडल्यानंतर संबंधित अधिकारी खाली पडण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे ते घाबरले व काम पूर्ण झाल्यावर ते नाट्यगृहातून निघून गेले.
मात्र याची माहिती ते आपल्या वरिष्ठांना देण्यास विसरले. त्यामुळे शीट तशीच लटकत राहिली. त्यानंतर जादूचा कार्यक्रम सुरू असताना ती खाली पडली.
www.konkantoday.com