
रत्नागिरी येथील रेल्वे स्टेशन येथे सॅण्डवीज विकणाऱ्या फेरीवाल्याचा चालत्या रेल्वेतून पडून मृत्यू
_कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील रेल्वे स्टेशन येथे सॅण्डवीज विकणाऱ्या तरुणाचा रेल्वे चढत असताना प्लॅटफॉर्मवर पडल्याने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे सध्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सॅण्डवीजसह अन्य खाद्य पदार्थांचीही विक्री केली जाते.शनिवारी प्रवाशासाठी गाडी थांबायच्या अगोदर सॅण्डवीज विक्रीसाठी घेऊन जाणारा तरुण रेल्वेत चढताना रेल्वेच्या प्लॅटफार्म क्र. २ वर पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.सुंदरकुमार चंद्रदीप सहानी (३२, रा. पडवेवाडी-कुवारबाव, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवार १६ मार्च रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास कोकण रेल्वेच्या कुवारबाव रेल्वेस्टेशन प्लॅटफार्म क्रं. २ येथे घडली. सुंदरकुमार सहानी याचे खाद्य पदार्थ विक्री करणे हे उदरनिर्वाहाचे साधन होते. www.konkantoday.com