राजापुरातील पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करू नये: अँड. खलिफे यांची मागणी
राजापूर येथे सुरू असलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून दोन्ही जिल्ह्यांमधील लोकांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे राजापूर अन्यत्र येथे कार्यरत असलेले पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केली आहे.
राजापूर पोस्ट कार्यालयामध्ये सुरू असलेले पासपोर्ट कार्यालय राजापूर येथून रत्नागिरी येथे स्थलांतरित करावे, अशी मागणी काही लोकांकडून होत आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे.पूर्वी पासपोर्ट कार्यालयमुंबई येथे असल्याने खर्चासह वेळेचा अपव्यय होत होता. मात्र राजापूर येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने खर्चासह वेळेचा कमी अपव्यय कमी होत आहे. राजापूर हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने काढण्यासाठी ये-जा करणे लोकांना अधिक सोयीचे ठरते. मुंबई येथे पासपोर्ट काढण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या ठिकाणी खर्चासह वेळेचेही बचत होत आहे. त्यातून या पासपोर्ट कार्यालयाला लोकांकडून प्रतिसाद मिळताना पासपोर्ट दिसत आहे. त्यामुळे राजापूर कार्यरत असलेले पासपोर्ट
कार्यालय कुठेही अन्यत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी अँड. खलिफे यांनी केली आहे.
www.konkantoday.com