
त्या’ तथाकथित भोंदूबाबाने फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची व्हॅगनार कार पोलिसांकडून जप्त
खेडतालुक्यातील भरणे – त्या’ तथाकथित भोंदूबाबाने फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची व्हॅगनार कारगणेशनगर येथील एका महिले गुप्तधनाचे आमिष दाखवत जादूटोण्याचा प्रकार करत तब्बल ४१ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेतील ‘त्या’ तथाकथित भोंदूबाबाने फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची व्हॅगनार कार येथील पोलिसांनी पाटण-हिरेवाडी येथून जप्त केली. पोलीस कोठडीतील तिघांना आज सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
भरणे – नवानगर येथे वास्तव्यास असलेल्या विठाबाई अण्णाप्पा पवार या महिलेस प्रसाद हरीभाऊ जाधव, विवेक यशवंत कदम, ओंकार विकास कदम या तीन भोंदूबाबांनी गुप्तधनाच्या नावाखाली कोट्यवधी रूपये मिळवून देतो, असे आमिष दाखवत मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तब्बल ४० लाख ९० हजार रुपये उकळले होते. बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही गुप्तधन मिळत नसल्याने झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलस
स्थानकात तक्रार नोंदवली दाखल केली होती
www.konkantoday.com