
जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली.शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर झाले असले तरी पुरस्कार वितरणाची मात्र शिक्षकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार मिळणार नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये मंडणगड- सुनील आईनकर (पूर्ण प्राथमिक शाळा- शेनाळे), दापोली- जयंत सुर्वे (प्राथमिक शाळा पाजपंढरी), खेड- सुधाकर पाष्टे (ऐनवरे शाळा), चिपळूण-पांडूरंग कदम (पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मालघर क्र.1), गुहागर- दशरथ साळवी (काजुर्ली शाळा क्र. 1), संगमेश्वर – उमेश डावरे (आदर्श केंद्रशाळा साखरपा क्र.1), रत्नागिरी- विशाखा पवार (कुवारबाव उत्कर्ष नगर), लांजा-संजना वारंग (पूर्ण प्राथमिक शाळा माजळ), राजापूर- पूर्ण प्राथमिक शाळा करक क्र.१ यांचा समावेश आहे.
आज सायंकाळी रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आले असले तरी पुरस्कार वितरण कधी होणार हे अद्याप निश्चित नाही.
www.konkantoday.com