कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असल्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कशेडी बोगद्यामधील एक लेन सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.अपघाताने शापित असलेल्या कशेडी घाटामध्ये अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात भरीस भर म्हणून मुख्य वळणावर पडलेले खड्डे हे आता जीवघेणे ठरू लागले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. खड्डे चुकवताना होणाऱ्या अपघातामुळे ही आता गंभीर बाब बनू लागली आहे.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेवला असल्याने अद्यापी कशेडी बोगदा यातील एक लेन सुरू होणार होती; मात्र ती सुरू न झाल्याने सध्याचा प्रवास कशेडी घाटातूनच सुरू आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे मार्गावर अपघात व वाहतूककोंडी देखील होत असल्याने हे खड्डे बुजवणार तर कधी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
www.konkantoday.com