
सुयोग रहाटेला कार्टुनिंगमध्ये मुंबई विद्यापिठाचे सुवर्णपदक
मुंबई विद्यापिठाच्या ५६व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या सुयोग रहाटे याने फाईनआर्ट प्रकारातील कार्टुनिंग (व्यंगचित्र) कलेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
सुयोग रहाटे महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी. व्होक.-बँकिंग अँड फायनान्स या वर्गात शिक्षण घेत आहे. गतवर्षी सुयोग याने याच स्पर्धेत मुंबई विद्यापिठाची २ रौप्यपदके प्राप्त केली होती. कार्टुनिंग स्पर्धेसाठी आयोजकांनी ”मुंबई मेरी जान” आणि ”वर्क फ्रॉम होम” हे दोन विषय दिले होते. सुयोग याने ”मुंबई मेरी जान” या विषयावर कार्टुनिंग करून परीक्षकांची मने जिंकून विजेतेपद प्राप्त केले. सुयोगला कलाशिक्षक सूरज मोहिते, विलास रहाटे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मार्गदर्शक विलास रहाटे यांनी मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेत अनोखा विक्रम केला आहे. विलास रहाटे यांनी मार्गदर्शन केलेल्या सुवर्णपदक प्राप्त सुयोग रहाटेसह जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे येथील श्रुती कामतने रौप्यपदक, तर विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेजच्या झोया वारसीने कास्यपदक प्राप्त करून विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.
www.konkantoday.com