
मराठा समाजावर झालेला लाठीचार्ज अन्यायकारक, सदर घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी-आमदार डॉ.राजन साळवी
शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या कडून मराठा समाजावर अन्यायकारक झालेल्या लाठीचार्जमधील दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे
मराठा समाजाला शिक्षण नोकरी यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाकडून मागणी केली जात आहे. या मागणी करणार्या मराठा समाजावर झालेला लाठीचार्ज अन्यायकारक असून सदर घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मराठा समाज, लांजा तालुका यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. त्याला आपला पाठींबा असल्याची भूमिका शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी स्पष्ट केली आहे. मराठा समाजावर अन्यायकारक झालेल्या लाठीचार्जमधील दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठा समाजाला शिक्षण नोकरी यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी मागील अनेक वर्षे मराठा समाज सनदशीर आणि शांततेमध्ये मोर्चे काढीत आणि आंदोलने करीत आहेत. या सनदशीर मार्गाने केल्या गेलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजातील तरुणांनी आत्मबलीदान केले आहे. मराठा समाजाने अत्यंत कष्टाने मिळविलेले आरक्षण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवू शकले नाही याबाबत मराठा समाजात संतप्त भावना आहेत. याचाच भाग म्हणून अंतरावली ता. अंबड जि. जालना या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील या मराठा मावळ्याने २९ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत उपोषण चालू केले आहे. ते उधळून लावण्यासाठी पोलिसांच्या प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. मराठा समाजातील महिला, लहान मुले, वयोवृध्द व्यक्ती, युवक, युवती यांच्यावर लाठी हल्ला व गोळीबार करुन जगाला आंदोलनाची दिशा देणा-या मराठा समाजावर हल्ला केलेला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक बाब आहे. याचा महाविकास आघाडी लांजा तालुका व लांजा तालुका मराठा समाजाने तहसीलदार लांजा यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला आहे. त्यांच्या या भूमिकेला आपण पाठींबा देत असून मराठा समाजावर झालेला लाठीचार्ज अन्यायकारक असून सदर घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केली आहे.
www.konkantoday.com