भिवंडी येथे इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू
दिनांक 2/9/2023 रोजी मध्यरात्री भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील अब्दुल बारी मोमीन बिल्डिंग साहिल हॉटेल जवळ मूर्तीचा कंपाउंड गौरीपाडा भिवंडी रात्री 12.30 ते 12:45 दरम्यान बिल्डिंग कोसळल्याने खालील व्यक्ती जखमी झाले आहेत.
1.अब्दुल लतीफ मोमीन पुरुष वय वर्ष 65
2.फरजाना अब्दुल लतीफ मोमीन स्त्री वय वर्ष 50
3.बुरारा अतिफ मोमीन स्त्री वय वर्ष 32
4.आदिमा अतीफ मोमीन स्त्री वय वर्ष 7
वरील जखमी व्यक्ती अल मोईन हॉस्पिटल, गौरीपाडा येथे दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वरील बिल्डिंग कोसळल्याने खालील व्यक्ती मयत झालेले आहेत
1.उजमा अब्दुल लतीफ मोमीन स्त्री वय वर्ष 40
2.तस्निम कौसर मोमीन मुलगी वय आठ महिने
www konkantoday.com