
फुणगुस मधील ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश
संगमेश्वर:-तालुक्यातील फुणगूस गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश केला.
फुणगुस गावाचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे सांगत या ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत व कसबा जि.प. गट विभाग प्रमुख श्री. महेश देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने येथील ग्रामस्थानी हा जाहीर प्रवेश केला.
याविषयी श्री महेश देसाई यानी माहिती देताना सांगितले की २००९ मध्ये खाडी भाग हा रत्नागिरी विधान सभा मतदार संघाला जोडल्या नंतर नेहमीच येथील प्रसिद्ध जाहीर शेख पीर बाबांच्या दर्ग्याचे व्यवस्थापक व प्रतिष्ठित मानले जाणारे असे नासीर भाई मुजावर आज ते हयात नाहीत परंतु त्यांनी नेहमीच श्री सामंत यांना आशीर्वाद दिला आहे. आज त्यांचा वारसा जपणारे मुज्जमिल मुजावर , मुसाविर मुजावर यांनी सर्वांना सोबत घेवुन कोंड्ये ,फुणगुस जमातीचे अध्यक्ष हानिफ खान यांच्यासह सर्व सहकार्यांना एकत्र घेत एक प्रवेशाचा निर्णय घेत सक्रिय कामाला सूरवात केली. तर बाप्पा भोसले, राजा टाटरे यांनी सुद्धा आपल्या सहका-यानी जाहीर प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुजमील मुजावर, हनीफ खान मज्जिद पटेल, इलियाज नाईक मुनीरखान; जमीर नाईक, इलियाज नाईक, राजेश ताठरे मुनीर खान मुसवीर मुजावर, मैनुद्दीन मापारी, यासीन पटेल, मुनाफ खान, इकलाक बोदले, आफक बोधले ,विठ्ठल भोसले नथुराम भोसले, प्रकाश भोसले यांच्यासह आज अनेकानी शिवसेने (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महेश देसाई, संगमेश्वर उपतालुका प्रमुख परशुराम वेल्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com