ड्युटीवर असताना एसटी चालक दारू पिऊन आढळला, पोलिसात गुन्हा दाखल
ड्युटीवर असताना एसटी चालक दारू पिऊन आढळल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला आहे याबाबत चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही घटना शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी स.6.30 वा.रहाटाघर एसटी स्टँड येथे घडली.ज्ञानेश दिलीप सुर्वे (31,रा.आदर्श वसाहत कारवांचीवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.त्याच्या विरोधात वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप शिवाजी पाटील (34,रा.रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी ज्ञानेश सुर्वे आपले कर्तव्य बजावत असताना दारुच्या नशेत होता.त्याच अवस्थेत तो रत्नागिरी ते पावस जाणारी एसटी (एमएच-14-बीटी-1226) चालवताना मिळून आल्यावर ही कारवाई करण्यात आली.त्याच्या विरोधात मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com