जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पठारावरील हंगामास आजपासून सुरुवात


जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पठारावरील हंगामास आजपासून (दि. 3 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. कास पठार सद्या विविधरंगी फुलांनी बहरले आहे.
पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येत आहे. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामाचा शुभारंभ केला जाणार आहे.

आज रविवारपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फुलांच्या हंगामाच्या शुभारंभानंतर फुलांच पठार पर्यटकांसाठी पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे. जागतिक वारसा स्थळावर असणाऱ्या कास पठारावर सद्या हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस ,दाट धुके, व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. हळू पर्यटकांची गर्दी ही वाढू लागली असून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

कास – पठारावर फुलांच्या विविध प्रजातींची उगवण चांगली झाली असून पठार रंगबिरंगी फुलांनी चांगलेच बहरले आहे. कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरली असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुल ही दिसू लागले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उमलणारी फुले ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळू हळू दिसू लागली आहेत. या ठिकाणी फुले पाहण्यासाठी 150 रुपये पर्यटन शुल्क आकरले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. www.kas.ind.in या वेबसाइटवर जाऊन किंवा प्रत्यक्ष जागेवरही बुकिंग करता येणार आहे.
सध्या कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी, सोनकी, तेरडा, गेंद, टूथब्रश, नीलिमा आदी विविध फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या दिसू लागल्या आहेत. ऊन-पावसाचा खेळ असाच सुरू राहिल्यास येत्या आठ- दहा दिवसांत विविधरंगी फुलांचा मोठ्या प्रमाणात बहर येऊन गालिचे पाहायला मिळतील. कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, सुरक्षारक्षक व इतर कामांसाठी साधारणतः 150 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button