
कळझोंडी धरणाची उंची वाढवू नये- ग्रामस्थांची मागणी
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कळझोंडी धरणाची उंची वाढवू नये. ही उंची वाढविल्यास वरवडे गावातील शेती, बागायती, पिण्याचे पाणी यावर परिणाम होईल व सखल भागात वस्ती असल्याने अचानक नैसर्गिक आपत्ती झाल्यास पुरात संपूर्ण वरवडे गाव वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामस्थांनी या धरणाची उंची वाढविण्यास विरोध केला आहे. तसेच यासाठी गावाच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरावरुन तज्ञांची नेमणूक करावी व याची माहिती ग्रामस्थांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाण्याच्या टाक्यांची तसेच पाईपलाईनची नव्याने दुरूस्ती करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
www.konkantoday.com