कोकण रेल्वे मार्गावरील ” पनवेल-चिपळूण डेमू सेवेबाबत रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा खुलासा
याही वर्षी 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे
कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही.याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भातील आधी दिलेलं वृत्त चुकीचं आहे. कोकण रेल्वे मार्गावर पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) स्वतंत्र मेमू ट्रेन सोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार हे वृत्त चुकीचं असून पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) अशी स्वतंत्र मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे मुंबईहून चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मागील काही वर्षांपासून चिपळूणसाठी स्वतंत्र लोकल श्रेणीतील रेल्वे गाडी सोडण्यात येते. याही वर्षी 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे.
www.konkantoday.com