भर रस्त्यात एसटीच्या चालकाला मारहाण करणाऱ्या अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरात टीआरपी जवळ अपघात करून बस चालकालाच मारहाण करणाऱ्या अज्ञात कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
या कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून एसटीला धडक देत अपघात केला.त्यानंतर एसटी चालकालाच शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना श्ाुक्रवार 1 सप्टेंबर रोजी दु.3.40 वा.टिआरपी येथे घडली.
एसटी चालक बसप्पा शंकर सपले (40,मुळ रा.शिरोळ कोल्हापूर सध्या रा.राजापूर) असे जखमी एसटी चालकाचे नाव आहे.शुक्रवारी दुपारी ते आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-20-बीएल-1535) घेउन जात होते.ते टीआरपी स्टॉप येथे आले असता काळ्या रंगाची हुंदाई (एमएच-12-एचएल-5006) वरील अज्ञात चालकाने त्यांच्या एसटीला पाठीमागून धडक देत अपघात केला.बसप्पा सपले यांनी एसटी जागीच थांबवल्यावर कारवरील त्या अज्ञात चालकाने त्यांना एसटीमधून खाली उतरवून शिवीगाळ करत हातांच्या ठोशांनी मारहाण केली.याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com