
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 1 सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा अद्यापही हवेतच
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 1 सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू करणार असल्याच घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र ही घोषणा सध्या तरी हवेतच राहिली आहे गेल्या तीन दिवसांपासून चिपी विमानतळावर एकही विमान उतरलेले नाहीए. तसेच 1 सप्टेंबरला अपेक्षित असलेली विमानाची फेरीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नियमित विमानसेवा मिळण्याचे अद्याप कोकणवासी यांच्या नशिबी नाही
अनियमीत विमान सेवेमुळे चिपी विमानतळावर येणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.याचा जिल्ह्याच्या एकुणच विमान प्रवासावर नकारात्मक परिणाम दिसत आहे.
जिल्ह्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून चिपी विमानतळाकडे पाहीले जात होते. मोठा गाजावाजा करून येथील विमानसेवा सुरू करण्यात आली. येथे मुंबई ते चिपी अशी नियमीत विमानसेवा आहे. यामुळे जिल्हा मुंबईला अधीक जवळ आला. हे विमानतळ किनारपट्टीपासून जवळ असल्याने पर्यटनाला फायदा होईल असे चित्र होते; मात्र विमानसेवेतील अनियमीततेमुळे एकुणच हवाई प्रवासाबाबत नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. सलग तीन दिवस विमानफेरी रद्द झाल्याने या विमानतळावर येणार्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरून आधीच अनियमित असलेल्या विमानसेवेमुळे प्रवासी संख्या रोडावली असताना २९ ऑगस्टपासून सलग तीन दिवस विमानफेरी रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे ४ डिसेंबरला भारतीय सेनादलाच्या कार्यक्रमानिमित्त देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच विमानतळावर उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार विमानतळाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केली आहे; मात्र त्याआधी सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करून विमानसेवा नियमीत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अलीकडेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विमानसेवेबाबत हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेवून हा प्रश्न मांडला होता. त्यांनी यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले होते. ही सेवा लवकर नियमीत करावी आणि हवाई वाहतुकीबद्दल विश्वास अधिक घट्ट करावा अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करत आहेत.
www.konkantoday.com