सार्वजनिक ठिकाणीदारू पिणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू
सार्वजनिक ठिकाणी
दारू पिणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे
ग्रामीण पोलिसांकडून ३१ ऑगस्ट २०२३ रोजी शहरालगतच्या चंपक मैदान येथे नेहमीप्रमाणे गस्त घालण्यात येत होती. सायंकाळी ७ च्या सुमारास मोसीन सलीम शेख (३६, रा. कोकणनगर, रत्नागिरी) व सोमासिंग जिवळू राठोड (५३, रा. भाट्ये रत्नागिरी) हे दोघे दारू पिण्यासाठी बसल्याचे पोलिसांना आढळून आले. तर जयगड पोलिसांना तालुक्यातील रिळ उंडीफाटा येथे अरूण गणपत गावणकर (५४, रा. रिळ उंडी, रत्नागिरी) हा दारू पिण्यासाठी बसलेला आढळून आला. तीनही संशयितांविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल केला
www.konkantoday.com